जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांबाबत होणार उपाय योजना

वसंत खंडेलवाल

आमदार वसंत खंडेलवाल व परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यात चर्चा

अकोला: राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार गुरुवारी ( दि. 23)

Related News

अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी आमदार खंडेलवाल यांनी भीमनवार यांचे स्वागत केले. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामधील

अपघातप्रवण स्थळे आणि त्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.
तिन्ही जिल्ह्यातील रस्ते चांगले झाले

असून रस्ते आणि उड्डाण पूलांमुळे वाहनधारकांची चांगली सोय झाली आहे.

मात्र तरीही अनेक ठिकाणी काही वाहनधारक नियमांचे पालन करीत नसल्याने व काही ठिकाणी अपघात प्रवण स्थळे

असल्याने अपघाताचे अनेक प्रकार घडले आहेत.

या सर्व ठिकाणांची परिवहन आयुक्तांनी पाहणी केली व त्या संदर्भात आमदार खंडेलवाल यांच्यासोबत चर्चा केली.

तिन्ही जिल्ह्यातील अशी जी ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी किंवा भविष्यात या संदर्भात

करावयाच्या उपाययोजना संदर्भात दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
दररोज कमी धावणाऱ्या स्कूल बसेस संदर्भातही यावेळी चर्चा झाली. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस अतिशय कमी चालतात.

असे असतानाही पंधरा वर्षांनी स्क्रॅप करण्याचा नियम त्यांना लागूच आहे.

बसेस आणि सिटी बसेस यांच्यासाठी काही बदल करायला हवा अशी महत्वपूर्ण सूचना आमदार खंडेलवाल यांनी यावेळी मांडली.

परिवहन आयुक्तांनी ही बाब मान्य करून त्या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय परिवहन विभागाकडे पाठविण्याचे

मान्य केले.

Read Also

https://ajinkyabharat.com/issue-of-disintegrating-gazala-seeds-in-district-council-meeting/

Related News