टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपवर कोरलं नाव, पहिल्यांदाच जिंकली स्पर्धा

भारतीय संघाने जिंकला विश्वचषक
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ तुल्यबल आहेत. त्यामुळे हा सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होते. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 246 धावा करू शकला. यासह भारताने पहिल्यांदाच जेतेपद नावावर केलं आहे. भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलंं आहे. यापूर्वी 2005 आणि 2017 साली भारताने अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 7 षटकात 70 धावांची गरज होती. तर भारताला विजयासाठी 2 विकेट्सची गरज होती. कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती . त्यादरम्यान एक विकेट रन आउट मिळाल्यानंतर अखेरची विकेट कधी पडणार याची उत्सुकता असतानाच अखेर भारताला ती यश आलं आणि भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरल. एकंदरीत आजच्या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघावर वरचढ दिसून आला. पहिल्यांदाच भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यामुळे संपूर्ण भारतात सर्वत्र एकच जल्लोष पाहायला मिळाला. दिवाळी सारखी फटाक्यांची आतिषबाजी करून भारतवासीयांनी भारतीय महिला संघाचा हा विजय साजरा केला.
