अक्षय नागलकर हत्या प्रकरण: अकोला गुन्हे शाखेकडून 4 नवीन आरोपींना अटक

अक्षय नागलकर हत्या प्रकरण

बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणात नवीन चार आरोपींना अटक; आरोपी संख्या आठवर

स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई, चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

अकोला – शहरात खळबळ उडवून देणाऱ्या अक्षय नागलकर हत्या प्रकरणात आणखी चार आरोपींना स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली असून, आधीच अटकेत असलेल्या चौघा आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजून १५ मिनिटांनी, मारोती नगर, बाळापुर रोड, जुने शहर अकोला येथील अक्षय विनायक नागलकर (२६) हा “थोड्याच वेळात येतो” असे सांगून घराबाहेर गेला. मात्र तो परतला नाही. त्यानंतर त्याची आई सौ. शिला विनायक नागलकर यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून मिसींग क्रमांक ४४/२०२५ नोंदविण्यात आला.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपासाची जबाबदारी शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्याकडे सोपविली. तसेच स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख पो.नि. शंकर शेळके यांना आरोपी शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले.

पहिल्या टप्प्यातील अटक

Related News

गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा.च्या व इतर पथकाने पहिल्या टप्प्यात ४ आरोपींना ताब्यात घेतले होते— चंद्रकांत महादेव बोरकर (रा. शिवसेना वसाहत, अकोला), उर्फ आशु शिवकुमार वानखडे (रा. जुने शहर, अकोला) क्रिष्णा वासुदेव भाकरे (रा. मोठी उमरी, जि. अकोला)अशोक उर्फ ब्रम्हा पांडुरंग भाकरे (रा. मोरगाव भाकरे,या आरोपींना तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांनी न्यायालयासमोर हजर केले असता, सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यात चार आरोपी अटक

यानंतर स्था.गु.शा.च्या पथकाने २६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकरणातील आणखी चार आरोपींना अटक केली त्यामध्ये रोहित गजानन पराते (रा. पार्वती नगर, बाळापुर नाका, अमोल अजाबराव उन्हाळे (रा. हरीहरपेठ, जुने शहर, नारायण गणेश मेसरे. राहणार बाळापुर नाका, आकाश बाबुराव शिंदे रा. भौरद, यांचा समावेश आहे आरोपी पैकी रोहित पराते व अमोल उन्हाळे यांना स्थानिक गुन्हे शाखेने अहील्यानगर येथून, तर नारायण मेसरे याला बाळापूर येथून आणि आकाश शिंदे यास अकोला रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या चार आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

एक आरोपी अद्याप फरार

या प्रकरणातील प्रमुख आरोपी नामे शिवा रामा माळी हा अजूनही फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलीसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

तपासाचे मार्गदर्शन व पथकाची भूमिका

ही संपूर्ण कारवाई  पोलीस अधीक्षकअर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत सपोनि गोपाल ढोले, पोउपनि गोपाल जाधव तसेच पोलीस अमंलदार शेख हसन, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, वसीमोददीन, मोहम्मद एजाज, किशोर सोनोने, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, गोकुळ चव्हाण, सुल्तान पठाण, उमेश पराये, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मो.आमीर, राज चंदेल, श्रीकांत पातोंड, सतिष पवार, स्वप्नील खेडकर, अशोक सोनवणे, अन्सार अहमद तसेच चालक प्रशांत कमलाकर, मनीष ठाकरे व विनोद ठाकरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

पुढील दिशा

आठ आरोपी अटकेत असून, त्यांच्याकडून चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तविली जात आहे. मुख्य आरोपी शिवा माळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. तपास सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/akola-mh-30-hotel-murder-case/

Related News