७ क्रमांक हा फक्त महेद्रसिंग धोनीचाच…, ‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही’

मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही

जान्हवी कपूर सध्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्पटामुळे चर्चेत आहे. जान्हवी चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी वेगवेगळे लूक्स करण्याचा प्रयत्न करतेय. याआधी जान्हवीने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. त्याच्या मागच्या बाजूला क्रिकेटच्या चेंडूंची डिझाईन तयार केलेली आहे

आजच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय, यानिमित्ताने जान्हवीने खास लाल आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.

Related News

त्यालाच मॅचिंग असं स्लीवलेस ब्लाऊज तिने परिधान केलं होतं. या ब्लाऊजची खासियत अशी की, त्यामागे ६ नंबर लिहिला होता आणि त्याखाली माही असं लिहिलं होतं.

‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी यांच्या आयुष्यावर आधारित असल्याने चाहते या नंबरमुळे पेचात पडले आहेत.

कारण महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर ७ आहे. या नंबरवरून चाहत्यांचा गोंधळ होऊ लागल्याने आता जान्हवीने या नंबरमागचा खुलासा केला आहे.

जान्हवीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले. यावर एका चाहत्याने प्रश्न विचारला की,

“मिस्टर अँड मिसेस माहीच्या प्रमोशन्ससाठी तू जे काही आउटफिट्स घालतेस, त्यावर ६ नंबर का आहे?

त्यामागे दंतकथा काय आहे?” यावर जान्हवीने उत्तर दिलं, ती म्हणाली,

“सगळे जण मला विचारतायत की मी सगळीकडे ६ नंबर असलेले आउटफिट्स घालून का फिरतेय.

महिमाची जर्सी नंबर ६ आहे आणि महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर ७ आहे.

जरी ती महेंद्रसिंग धोनीची मोठी फॅन असली, जसे आपण आहोत; तरी तो नंबर ती वापरू शकत नाही.”

जान्हवी पुढे म्हणाली, “शरण, मी आणि आम्ही सगळे जेव्हा ठरवत होतो की चित्रपटात माझा जर्सी नंबर काय असेल,

तेव्हा आम्हाला जाणवलं की ७ हा जर्सी नंबर फक्त धोनीचाच राहिला पाहिजे. तेव्हा आम्हाला दुसरा नंबर निवडायचा होता.

६ नंबर हा माझा लकी नंबर आहे आणि आशा आहे, हा नंबर माझ्यासाठी भाग्यवानदेखील असेल;

म्हणून महिमाचा जर्सी नंबर ६ आहे आणि धोनी सरांचा जर्सी नंबर ७ आहे आणि तो नेहमीच ७ राहील. मला असं नाही वाटत की कोणीही त्यांच्या या ७ नंबरचा वापर केला पाहिजे.”

दरम्यान, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

तर ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जान्हवी कपूरबरोबर या चित्रपटात राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Related News