शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मोठी घोषणा केली आहे. सध्या कंगना मंडीमध्ये जोरदार प्रचार करत आहे. या मतदारसंघातून आपण निवडून येऊ, असा विश्वास तिनं व्यक्त केला. तिनं चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल मोठी घोषणाही केली.
लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास, खासदार झाल्यास मी हळूहळू चित्रपट क्षेत्रातून बाहेर पडेन. कारण मला एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे, असं कंगनानं ‘आज तक’ वृत्तवाहिनीला सांगितलं. चित्रपट क्षेत्र आणि राजकारण यांचा समतोल कसा साधणार असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर ‘मी चित्रपटसृष्टीतही कंटाळते. मी भूमिका साकारते. दिग्दर्शनही करते. मला राजकारणात शक्यता दिसल्यास, जनता मला उत्तम प्रतिसाद देत असल्यास, मी पूर्ण वेळ राजकारणच करेन. मी एकावेळी एकच काम करेन,’ असं उत्तर कंगनानं दिलं.
लोकांना माझी गरज असल्याचं लक्षात आल्यास मी त्याच दिशेनं जाईन. मी मंडीतून जिंकल्यास राजकारणच करेन. अनेक चित्रपट निर्मात्यांनी मला राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला. तुम्हाला लोकांच्या आशा पूर्ण कराव्या लागतात. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा फटका लोकांना बसल्यास ते योग्य होणार नाही. मी एक अतिशय उत्तम आयुष्य जगले आहे. आता मला लोकांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी त्या संधीचं सोनं करेन. लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतील, तर त्या पूर्ण करायला हव्यात. लोकांना न्याय द्यायला हवा, असं कंगना म्हणाली.
Related News
दादरमध्ये रामरक्षा आंदोलन : मुसळधार पाऊस, रेड अलर्ट आणि प्रशासनाकडून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन अशा परिस्थितीतही मुंबईतील दादर परिसर रविवारी भगवामय झाल्याचे चित...
Continue reading
TMC Crisis : ममता बॅनर्जींना 5 मोठे धक्के! प्रदेशाध्यक्ष चंद्रिमा भट्टाचार्यांचा धक्कादायक राजीनामा, तृणमूलमध्ये वाढले बंड
पश्चिम बंगालच्या राजक...
Continue reading
अंबरनाथ नगरपरिषदेच्या सभेत शिंदे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी 'थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे' असे वादग्रस्त...
Continue reading
Parliament Monsoon Session २० जुलै ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षफुटी, १३१वे घटनादुरुस्ती विधेय...
Continue reading
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी पा...
Continue reading
पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ! अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; काँग्रेस फुटणार की केवळ राजकीय योगायोग?
पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील का...
Continue reading
PM मोदींचा भार कमी होणार? अमित शाह उपपंतप्रधानपदी विराजमान होणार? मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग; 7 मोठे संकेत
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मं...
Continue reading
कल्याण-शीळ मार्गावरील भीषण ट्रॅफिक जॅमवरून राजकारण पेटलं, शिवसेना आमदार टार्गेटवर
Kalyan Shil Road Traffic Issue: कल्याण-शीळ मार्गावरील मेट्रो प्रकल्पा...
Continue reading
नितीन गडकरींना 'सुपर' जबाबदारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे....
Continue reading
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपविरोधात मोठा एल्गार पुकारला आहे. अयोध्या येथ...
Continue reading
सचिन अहिर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, उपसभापतीपदासाठी झालेल्या हालचाली, ऑपरेशन टायगर आणि दोन उद्योगपतींच्या ...
Continue reading
चित्रपटांपेक्षा राजकीय आयुष्यात किती फरक जाणवतो, असा प्रश्न कंगनाला विचारला गेला. त्यावर फिल्मी दुनिया खोटी असल्याचं कंगना म्हणाली. ‘तिथे एक वेगळं वातावरण तयार केलं जातं. एक बबल तयार करण्यात येतं. लोकांना आकर्षित करण्यासाठी बबलची निर्मिती केली जाते. पण राजकारणात वास्तव दिसतं. समाजकार्याच्या क्षेत्रात मी नवीव आहे. राजकारणात नवी आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायचा माझा प्रयत्न असेल,’ असं कंगनानं सांगितलं.