भुवनेश्वर : ओडिशातील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या चार जागांसाठी १३ मे रोजी होणाऱ्या निवडणूक रिंगणातील ३७ पैकी १७ उमेदवार कोट्यधीश आहेत, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नबरंगपूर, बेरहामपूर, कोरापुट आणि कालाहंडी लोकसभा मतदारसंघांसाठी रिंगणात एकूण ३७ उमेदवार असून, त्यापैकी १७ (४६ टक्के) उमेदवारांनी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे, असे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे.
सर्वात श्रीमंत उमेदवार
कालाहंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार मालविका देवी यांची ४१.८९ कोटींची संपत्ती असून, त्या सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. बेरहामपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व्ही. चंद्रशेखर यांची २८.७० कोटी आणि भारतीय विकास परिषदेचे बेरहामपूरचे उमेदवार राजेंद्र दलाबेहरा यांची १०.३० कोटींची संपत्ती आहे.
Related News
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
मी शहाबाज बोलतोय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ, पाकिस्तानी नंबरवरुन धमकी, पोलिस अलर्ट
मातोश्रीवर धूमधडाक्यात प्रवेश, शिवसेनेला नडले, सहाच महिन्यात ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याची भाजपात घरवापसी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…
आमचा देवेंद्र अत्यंत मितभाषी; कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा संताप, पत्नीसह जोग कुटुंबाच्या घरी भेट
कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊत यांचा घणाघात
आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी…, रावसाहेब दानवेंची पुन्हा जीभ घसरली, म्हणाले सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती
साळवींपाठोपाठ कोकणातील ठाकरे गटाच्या दुसऱ्या मोठ्या नेत्याकडून खंत व्यक्त, संजय राऊत म्हणाले…
नाशिकच्या सिंहस्थ कुंभ मेळा आयोजनावरुन महायुतीत कोल्ड वॉर, आज एकनाथ शिंदेंची स्वतंत्र बैठक
दिल्लीत ऑपरेशन टायगर, डिनर डिप्लोमसीतून शिंदे गटाचं उद्धव सेनेला खिंडार? श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यावर ठाकरेंचे खासदार
सर्वात गरीब उमेदवार
कोरापुट येथील एसयूसीआय (सी) पक्षाच्या उमेदवार प्रमिला पुजारी या सर्वात गरीब उमेदवार आहेत. त्यांच्याकडे केवळ २० हजार ६२५ रुपयांची संपत्ती आहे. बेरहामपूर येथील भाजप उमेदवार प्रदीप कुमार पाणिग्रही यांच्याकडे सर्वाधिक ३.८२ कोटींची संपत्ती आहे.
उमेदवारांपैकी दहा म्हणजे २७ टक्के जणांचे वय २५ ते ४० वर्षादरम्यान
– २३ जण म्हणजे ६२ टक्के उमेदवार ४१ ते ६० वयोगटातील
– चार जणांचे (११ टक्के) वय ६१ ते ७० वर्षादरम्यान
– सात (१९ टक्के) उमेदवारांचे त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले प्रलंबित
– उमेदवारांपैकी १४ म्हणजे ३८ टक्के जणांची शैक्षणिक पात्रता पाचवी ते बारावी उत्तीर्ण
– २२ म्हणजे ५९ टक्के उमेदवार पदवीधर, तर एका उमेदवाराने स्वतःला केवळ साक्षर असल्याचे जाहीर
– चौथ्या टप्प्यातील एकूण ३७ पैकी सात उमेदवार महिला