हैदराबाद : तेलंगणाच्या नाजामाबादचे काँग्रेसचे खासदार जीवन रेड्डी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका शेतकरी महिलेच्या कानशीलात लगावताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओवर तिच्या प्रश्नाला उत्तर देताना, ज्यामध्ये ते एका महिलेच्या कानशीलात लगावताना दिसत होते, निजामाबादमधील काँग्रेसचे खासदार जीवन रेड्डी म्हणाले, “हे प्रेम होते, ते प्रेम होते, ते प्रेम होते.” तेलंगणामध्ये १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
का उगारला हात?
ज्या महिलेवर जीवन रेड्डी यांनी हात उगारला त्या महिलेने भाजपला मत देणार असं म्हटलं होतं, असं सांगितलं जात आहे. हे ऐकताच रेड्डी संतापले आणि त्यांनी थेट त्या वृद्ध महिलेच्या कानशीलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक संताप व्यक्त करत आहेत.
Related News
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…
आमचा देवेंद्र अत्यंत मितभाषी; कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा संताप, पत्नीसह जोग कुटुंबाच्या घरी भेट
कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
बीडमध्ये मांडवली, मांडवली, मांडवली…सुरेश धस- धनंजय मुंडे भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने केला ‘तो’ मोठा गौप्यस्फोट, महायुती धर्मावरच संकट?
फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊत यांचा घणाघात
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
दावा- ईरानी राजदूत से मिले इलॉन मस्क:ट्रम्प की तरफ से की बात
शिंदेगट आणि ठाकरेगट आमनेसामने; प्रताप सरनाईक आणि नरेश मणेरा यांच्यात चुरशीची लढत
तेलंगणा येथे १३ मे ला चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यासाठी निजामाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जीवन रेड्डी शुक्रवारी आरमूर येथील एका गावात प्रचारासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत आरमूर येथून विधानसभेत पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार विनय कुमार रेड्डी हे देखील होते.
यादरम्यान त्यांनी काही मजूरांची भेट घेतली. यादरम्यान जीवन रेड्डी आणि कुमार रेड्डी हे या वृद्ध महिलेला भेटले. यावेळी महिलेने फूल या निशाणीवर म्हणजेच कमळावर मत देणार असं सांगितलं. हे ऐकताच जीवन रेड्डी यांनी महिलेच्या कानशीलात लगावली आणि त्यानंतर ते जोरात हसू लागले.
रिपोर्टनुसार, व्हिडिओमध्ये जी वृद्ध महिला दिसत आहे तिने विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसलाच मत दिलं होतं. पण, महिला काँग्रेसवर नाराज होती की तिला नाही घर मिळालं नाही पेन्शन मिळाली. त्यामुळे तिने भाजपला मत देणार असं म्हटलं होतं.