खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे झालेले प्रचंड नुकसान, तसेच हुमणी अळी आणि येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र रामदास बघे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी मा. उपविभागीय अधिकारी, खामगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, कृषिमंत्री, कामगार मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील वर्षी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे बाधित शेतकऱ्यांना जमीन खरडून गेल्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. वारंवार निवेदन करूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्वरित पंचनामे करून खामगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी. सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. मागील वर्षी झालेल्या जमिनीच्या नुकसानीची भरपाई लवकर द्यावी. हुमणी अळी व येलो मोजॅक रोगामुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी योग्य नुकसानभरपाई मिळावी. सातत्यपूर्ण पावसामुळे कपाशी पिकाच्या नुकसानीसाठीही मदत मिळावी. निवेदनात पुढे चेतावणी देण्यात आली आहे की, जर शासन-प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर लोकशाही मार्गाने शिवसेना आणि शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडतील. या वेळी तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शहरप्रमुख चेतन ठोंबरे, सूचना उपतालुकाप्रमुख संतोष सातव, महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री देशमुख, शहर प्रमुख वैशाली घोरपडे, ज्योती बुजाळे, माधुरी गवई, श्वेता म्हसाळ पाटील, कल्पना गायगोळ, तोताराम गावंडे, विलास हागारे, सागर वाघ, नारायण टिकार, रामकृष्ण वसतकार, दत्ता वडकार, सुरेश सूर्यवंशी, विष्णू कदम, सागर चव्हाण, प्रवीण पाटील धामोडे, निवृत्ती धामोडे, प्रभाकर बघे, ज्ञानेश्वर बघे, चेतन शलकर, गणेश बघे, सुनील बोदळे, सुजित चिकटे, सचिन पवार, निलेश बरदिया, गणेश अग्रवाल, संजय घाडगे, मारुती जगताप, प्रभू होंगे, धम्मपाल गवई आदींसह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
read also:https://ajinkyabharat.com/swami-chaitanyanandchas-face/
