कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांची घरे पाण्यात गेलेली आहेत आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरस्थिती संदर्भात बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अजूनही धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. भारतीय हवामान विभागाने उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, तर मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह येलो अलर्ट जारी केला आहे.
ऑरेंज अलर्ट जिल्हे: मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, पुणे
येलो अलर्ट जिल्हे: धुळे, आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह ऊसाचे मोठे नुकसान केले आहे. देवळेगव्हाण येथील 12 ते 13 शेतकऱ्यांच्या जवळपास 80-90 एकर ऊस पीक पूर्णतः बुरुज झाले.प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अलर्ट मोड सुरु केला आहे. पूरग्रस्त भागातील पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांसाठी मदत कार्य जलद गतीने सुरू आहे. लोकांनी पुढील 25 तास घराबाहेर न पडता खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे, कारण पावसाची तीव्रता कायम आहे आणि काही भागात पाणी अजूनही साचलेले आहे.
read also:https://ajinkyabharat.com/mulinch-pityavirudh-disdain/
