टीम इंडिया आशिया चॅम्पियन, पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा

भारताने जिंकला सामना
टीम इंडियाने सलग सातवा सामना जिंकत आशिया कप 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तिलक वर्मा आणि शिवम दुबे या जोडीने भारताला विजयी करण्यात बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाची आशिया कप जिंकण्याची ही नववी वेळ ठरली आहे.तिलक वर्मा आणि शिवम दुबे या जोडीने केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत आशिया कप 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून पूर्ण केलं.भारताने यासह हा सामना 5 विकेट्सने जिंकला आहे. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिला, एकूण नववा आणि सलग दुसऱ्यांदा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. इंडिया जिंकला

