सोशल मीडियावर सावध राहण्याचा सल्ला

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकत्याच ‘MHJ Unplugged’ या कार्यक्रमात सोशल मीडियाच्या वापराविषयी आपला धक्कादायक अनुभव सांगितला. प्राजक्ता म्हणाल्या, “मला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नव्हती, पण आता सोशल मीडियाची भीती वाटू लागली आहे.”अभिनेत्रीसोबत सायबर क्राईम महासंचालकांची भेट झाली होती. त्यांनी प्राजक्ताला सांगितले की, सायबर पोलिसांनी 19-20 वर्ष वयाच्या दोन मुलांना पकडले होते. प्राजक्ताने सांगितले की, “त्यातल्या एकाला त्यांनी फोन लावून दिला. मी विचारलं, तू असे का केलेस? त्याने उत्तर दिलं की मी तुमचा चाहता आहे, तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून मी फक्त काहीतरी पोस्ट केलं. त्याला हेही माहित नव्हतं की काय चुकीचं केलंय.”या मुलाने प्राजक्ताला विनंती केली की, कृपया हे त्याच्या घरी सांगू नका, कारण वडील चाबकाने मारतील, अशी कहाणी प्राजक्ताने सांगितली.कार्यक्रमात प्राजक्ताने सर्वांना आवाहन केले की, सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत कधीही माहिती पोस्ट करू नये.

read also : https://ajinkyabharat.com/wife-sodalan-diirashi-ascendant-kalam/