मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘अॅडल्ट स्टार’चा वापर केला जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला होता. त्यानंतर संबंधित अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे. “चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन” असा इशाराच नयानी यांनी दिला आहे.
काय म्हणाले अभिनेते राज नयानी?
“मी एक चरित्र अभिनेता आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी शब्द मागे घ्यावेत, माझी माफी मागावी अन्यथा, इच्छा नसतानाही मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी व्यक्त केली.
आज समाजमाध्यमा वर व्हिडीओद्वारे त्यांनी भूमिका मांडली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे, अशी अपेक्षा नयानी यांनी व्यक्त केली.
Related News
सातारा जिल्हा बँकेत राजकीय भूकंप! भाजपला ९, राष्ट्रवादीला ८ तर शिंदेसेनेला ४ जागा; सत्तेचे मोठे समीकरण!
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणते समीकरण बदलेल, याचा नेम नसतो. स...
Continue reading
विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजप नेत्याचा रविंद्र धंगेकरांवर संतापजनक हल्लाबोल! '१२ पक्ष फिरलेला माकडछाप' म्हणत नवनाथ बन यांची जहरी टीका
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजप आण...
Continue reading
विधानपरिषद निवडणूक २०२६: कराळे मास्तरांचा भाजपला मोठा नकार; ३३ हजार मतांचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ!
नितेश कराळे मास्तर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी बोलावलं तरी भाजपमध्ये जाणार नाह...
Continue reading
नागपूरमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय! हर्षवर्धन सपकाळांचे भाजपवर 5 मोठे आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय व...
Continue reading
प्रदीप पूर्णेकर प्रकरण पेटले! नरेश म्हस्केंचा ठाकरे गटाला इशारा; म्हणाले, “चुकीचं वक्तव्य केल्यास ठाण्यातून परत जाणार नाही”
Pradeep Purnekar Case: ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्य...
Continue reading
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट! २५,७५६ मतांचा विजयाचा कोटा ठरला; सानपांना जिंकवण्याचं शिंदेंसमोर आव्हान
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष...
Continue reading
राहुल गांधींना मोठा दिलासा! अमित शाह मानहानी प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; 2018 पासून सुरू होता खटला
सुल्तानपूर, उत्तर प्रदेश : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षन...
Continue reading
एकनाथ शिंदेंना जळगावात मोठा धक्का; माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांचा राजीनामा, अजित पवार गटात प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे सत्र सुरूच असून, मित्रपक्षांमधील नेते ...
Continue reading
पुणे शिक्षक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार? 85.87% मतदानामुळे निकालाचा सस्पेन्स!
पुणे : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर ...
Continue reading
बच्चू कडूंचा मोठा दावा; म्हणाले, ‘दोन पक्षांत फूट पडते की काय?’मनोज जरांगे यांच्या नावाने चर्चेत आलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात...
Continue reading
रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट निशाणाउत्तर प्रदेशातील मतदारयादीमध्ये कथितरीत्या आढळलेल्या विचित्र नावांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे...
Continue reading
Naseeruddin Shah On BJP: भाजपवर नसिरुद्दीन शाह यांचा जोरदार घणाघात! ‘ब्रेनवॉश आणि भीती’ वक्तव्याने खळबळ
नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर २०२६ : ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह पुन्हा एकदा रा...
Continue reading
“आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीजच्या भूमेकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी अब्रू नुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन.” असा इशाराच त्यांनी दिला आहे.
“शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे, त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरेन्समध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीजमधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता, असं नयानी यांनी स्पष्ट केलं.
“चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली आहे” असेही ते म्हणाले.
मी माझ्या भावना लपवत हा व्हिडिओ शूट करतोय; पण चित्राताई, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी कुटुंब व्यथित झालं आहे. गेल्या आठ वर्षात मी माझ्या तीन कुटुंबीयांना गमावलंय, त्यापैकी दोघांना तर करोना काळात गमावलं आहे. आता आम्ही तिघंच आहोत. मी एक पिता असून माझ्या दोन लेकरांचं पालनपोषण करतोय. पण एक राजकीय नेता राजकीय इराद्याने माझ्यावर आरोप करणं धक्कादायक आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.