वीकेंड का वारमध्ये होणार खुलासा

‘बिग बॉस 19’ मधून अवेज दरबार बाहेर?

‘बिग बॉस 19’ या छोट्या पडद्यावरील बहुचर्चित रिअॅलिटी शोमध्ये दर आठवड्याला काही ना काही नवे ड्रामे घडत असतात. वीकेंड का वार येताच एव्हिक्शनचे वारे वाहू लागतात आणि या आठवड्याचे बाहेर जाणारे स्पर्धक कोण, याबाबत उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक स्पर्धक गाजत आहेत, तर काही आधी शांत दिसणारे स्पर्धक आता अधिक ॲक्टिव्ह झाले आहेत. दबंग स्टार सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये आतापर्यंत दोन स्पर्धक – नतालिया आणि नगमा – घराबाहेर गेले आहेत. तर नेहल ही देखील बाहेर गेली होती, पण ‘बिग बॉस’ ने तिला सीक्रेट रूममध्ये पाठवले.या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये प्रणित मोरेची टीम हरली आणि त्यानंतर त्याची संपूर्ण टीम नॉमिनेट झाली. यामध्ये प्रणित मोरे, मृदुल तिवारी, गौरव खन्ना, अवेज दरबार, अशनूर कौर आणि नीलम गिरी यांचा समावेश होता. आताच्या माहितीनुसार, पब्लिक व्होटिंगच्या आधारे या आठवड्यात अवेज दरबार हा घराबाहेर जाणार आहे. मात्र, ‘बिग बॉस’ त्याला नेहलप्रमाणे सीक्रेट रूममध्ये पाठवेल की नाही, हे वीकेंड का वारमध्ये स्पष्ट होईल. वीकेंड का वारमध्ये गौहर खानची भेट: या वीकेंड का वार एपिसोडमध्ये गौहर खान सलमानसोबत सेटवर दिसणार आहे. गौहर अवेजला पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये येणार आहे आणि अनेक स्पर्धकांची प्रशंसा तसेच काहींना फटकारेलही. या आठवड्यात अवेजच्या खेळात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे, त्यामुळे त्याचे भवितव्य पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे कारण ठरणार आहे.

read also:https://ajinkyabharat.com/pravashana-motha-adathaa/