प्रवाशांना मोठा अडथळा

आधुनिक सुविधा येत्या काळात होणार उपलब्ध

 रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर मोठा बदल होणार आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत 2450 कोटी रुपयांच्या CSMT पुनर्विकास प्रकल्पात प्लॅटफॉर्म क्रमांक 18 1 ऑक्टोबर 2025 पासून सुमारे 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. या काळात या प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या – अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि बल्लारशाह-सीएसएमटी एक्स्प्रेस – फक्त दादर पर्यंतच धावतील.

सुमारे 1 लाख प्रवाशांना प्लॅटफॉर्म 18 बंदीमुळे अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या गाड्यांचे वेळापत्रक तात्पुरते बदलण्यात आले आहेत. CSMT च्या सर्व प्लॅटफॉर्मवर विस्तारित डेक उभारण्यात येणार आहेत. पायलिंगचे काम आणि सुरक्षा बॅरिकेड्स स्थापनेसाठी प्लॅटफॉर्म 18 तात्पुरते बंद केला जात आहे. सध्या CSMT वर प्लॅटफॉर्म 11 ते 18 वरून दररोज सुमारे 20-22 एक्स्प्रेस गाड्या धावतात.

नव्या डेकवर प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, ज्यात:

प्रशस्त प्रतीक्षा क्षेत्र

तिकीट काउंटर

खाद्यपदार्थांचे स्टॉल

वरच्या मजल्यावर खरेदी व मनोरंजन केंद्र

प्लॅटफॉर्म 12 आणि 13 विस्तारीकरणाच्या कामाच्या अंतिम टप्प्यात आहेत.मार्चमध्ये नॉन-इंटरलॉकिंग कामे पूर्ण झाली आणि सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. लवकरच प्रवाशांसाठी हे प्लॅटफॉर्म खुले होतील.

read also:https://ajinkyabharat.com/social-media-2/