विद्यार्थ्यांनी रंगीत नृत्य आणि फॅन्सी ड्रेसमध्ये घेतला सहभाग

विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने कार्यक्रम यशस्वी

अकोट – स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये ब्लू कलर डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, उपाध्यक्ष लूणकरन डागा, सचिव प्रमोद चांडक, दीपम लखोटिया, शारदा लखोटिया, सुधा डागा, रेखा चांडक, अवनी लखोटिया, तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल आणि अभिजीत मेंढे, मालती महल्ले, सारिका रेळे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात नर्सरी ते केजी 2 पर्यंत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी ब्लू कलरचा ड्रेसअप केला आणि टिफिनमध्ये ब्लू कलरचे फूड किंवा फ्रुट आणले होते. के.जी 1 व के.जी.2 च्या विद्यार्थ्यांनी ब्लू डे निमित्त नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली. ब्लू कलरशी संबंधित वस्तू, प्राणी किंवा अशोक चक्र, ब्लू फिश, पीकॉक, वॉटर ड्रॉप अशा वेगवेगळ्या वेशभूषेत विद्यार्थी आपल्या डायलॉग्ससह रंगमंचावर झळकले. यासाठी युगंधरा मरोळकर व पूजा राऊत पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात आनंद घेतला. सूत्रसंचालन कल्पना बिहाडे, अन्वी पवार, ज्ञानदा बेराड यांनी केले, तर आभार प्रदर्शन हर्षजीत बेराड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मीना वर्मा, वैशाली गावत्रे, सुनिता इंगळे, दीपाली कुलट, रश्मी बेराड, शुभांगी वाकोडे, निकिता महल्ले, माधुरी हाडोळे, रचना सुपासे, अर्चना वणवे, शीला काळे, कांचन नहाटे, कल्याणी काळे, सविता भोरखडे, ज्योती रंधे, ममता सोनटक्के, भावना खेडकर, सुदर्शन अंभोरे, संदेश चोंडेकर, रवी अंभोरे, सुयोग कल्पेकर तसेच सर्व प्रायमरीच्या मॅडमनी अथक परिश्रम घेतले.

read also:https://ajinkyabharat.com/citizen-vadhati-magani-gunhe-admission/