स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

मालिकेच्या दुसऱ्या पिढीतील कथा आणि कलाकार हे प्रेक्षकांचे लाडके ठरले. या पिढीत स्वर्णाची भूमिका साकारणाऱ्या नियती जोशी यांनी आपली स्वतंत्र छाप निर्माण केली होती. मोहसिन खानची आई आणि शिवांगी जोशीची सासू अशी त्यांची दमदार भूमिका चाहत्यांच्या मनात कोरली गेली.

मालिकेत वयस्कर पात्र रंगवताना नियती जोशींनी अभिनयाचा ठसा उमटवला. पण खरी नियती रिअल लाइफमध्ये मात्र अगदी उलट – तरुण, आकर्षक आणि अत्यंत ग्लॅमरस!नियती जोशी आज ४१ वर्षांच्या आहेत. त्यांनी अद्याप विवाह केला नाही आणि सध्या आपले सिंगल लाइफ एन्जॉय करत आहेत.
त्यांच्या इंस्टाग्रामवर तब्बल ४९३ हजार फॉलोअर्स आहेत. चाहते त्यांच्या प्रत्येक फोटोची आतुरतेने वाट पाहतात. नियती स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात आणि ग्लॅमरच्या बाबतीत तर नामांकित अभिनेत्रींच्या तोडीस तोड ठरतात.

२००६ साली ‘घर की लक्ष्मी बेटियां’ या मालिकेतून त्यांनी अभिनय प्रवास सुरू केला आणि मागे वळून पाहिलेच नाही. आजही त्यांची लोकप्रियता कायम आहे. मालिकेत त्यांनी सासूचे पात्र अप्रतिम वठवले, मात्र रिअल लाइफमध्ये त्या फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या सिजलिंग फोटोशूट्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
नियती जोशी म्हणजे मालिकेत गंभीर सासू, पण वास्तवात ग्लॅमरस दिवा – हेच त्यांचं खास वैशिष्ट्य आहे!
