कळंबी महागाव: २५ सप्टेंबर २०२५ रोजी बाळापुर तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा कळंबी महागाव येथे नवनिर्वाचित शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान तंटामुक्ती अध्यक्षांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश सावळे यांनी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करून वंदन करण्यापासून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. या वेळी शिक्षक वृंद अमित वाघमारे, दत्तात्रय घोगले, सुषमा देशमुख, उमेश सावळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती –
जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन बावस्कर
Related News
पोलीस पाटील चंद्रमणी सावळे
उपसरपंच विजय सावळे
सावळे बोध्दाचार्य जुगल सावळे
सामाजिक कार्यकर्ते दिवाकर सावळे, भारत सावळे, गोविंदा सावळे, विनोद सावळे, प्रदीप सावळे, शरद इंगळे, संतोष कासारकर
अंगणवाडी सेविका सुवर्णा सावळे, उमेश सावळे
स्थानिक पत्रकार श्रीकृष्ण पवार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तंटामुक्त अध्यक्ष कडू सावळे यांनी केले.शाळेतील शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षकांना सन्मानित करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमातून शाळा आणि स्थानिक समाज यामधील घट्ट बंधन दृढ करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
read also:https://ajinkyabharat.com/pedgavamadhya-ideal-message/
