पेडगावमध्ये आदर्श संदेश

दोन उत्सव एकात्मतेने साजरे करण्याचा निर्णय

पेडगाव  : मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव गावाने आदर्श गाव म्हणून उभे राहण्याचा मान मिळवला आहे. गावातील आंबेडकर नवयुवक मंडळ आणि दुर्गा उत्सव मंडळ यांनी एकत्र येऊन गावातील सर्व सण, उत्सव आणि जयंती एकात्मतेने व सामंजस्याने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील दोन प्रमुख वार्षिक कार्यक्रम – धम्मचक्र प्रवर्तक दिन आणि दुर्गा महोत्सव – आता गावातील सर्व लोक एकत्र येऊन साजरे करतील. यामध्ये किशोर शेळके ठाणेदार यांनीही स्तुती केली आणि गावाच्या एकात्मतेची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, हे गाव मला आयुष्यात पाहिलेल्या गावांमध्ये आदर्श ठरले आहे, कारण वाद आणि मतभेद असूनही लोक एका ठिकाणी शांततेने एकत्र येतात. मागील वर्षी दुर्गा विसर्जनाच्या दिवशी काही लहान मुलांमुळे अनावश्यक वाद झाला होता; तो जातिवादावर आधारित नव्हता, पण गावकऱ्यांनी त्याचा प्रभाव लक्षात घेऊन पुन्हा एकात्मता आणि शांतता प्रस्थापित केली. या अनुभवातून गावकऱ्यांनी ठरवले की, पुढील सर्व सण, जयंती आणि उत्सव सार्वजनिक आणि एकत्रितपणे साजरे केले जातील. या निर्णयाचे नेतृत्व दोन्ही मंडळांचे अध्यक्षांनी केले .

आंबेडकर नवयुवक मंडळाचे अध्यक्ष: जगदीश दंदे

दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष: राजू इंगोले

गावातील हा निर्णय एकात्मता, शांतता आणि सामाजिक बंधन मजबूत करण्याचा संदेश देणारा ठरतो आहे.पेडगाव गावाने दाखवले की, मतभेद असूनही सहकार्य व संवादाने आदर्श समाज उभारता येतो.

read also:https://ajinkyabharat.com/riyadamadhyay-pudhachaya-pach-varshaparyant-bhade-stantha-rahanar/