मुंबई : विराट कोहलीचा स्ट्राइक रेट हा सध्याच्या घडीला चिंतेचा विषय ठरला आहे. कारण कोहली मोठी खेळी साकारतो, पण जास्त चेंडू त्यासाठी वापरतो. त्यामुळे कोहलीवर आयपीएल सुरु असताना जोरदार टीका केली जात आहे. पण तरीही त्याला टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर कोहलीच्या या स्ट्राइक रेटबद्दल निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी अखेर मौन सोडले आहे.
विराट कोहलीने आयापर्यंतच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आरसीबीकडून तो एकटाच दमदार फलंदाजी करताना दिसतो. विराटने या आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शतकंही झळकावली आहेत. पण आयपीएलमध्ये जिथे खेळाडू ४०-४५ चेंडूंमध्ये शतक झळकावताना दिसली तिथे कोहली शतकासाठी ६० चेंंडूं घेताना दिसला, त्यामुळेच त्याच्यावर टीका केली जात आहे.
कोहलीबाबत अगरकर म्हणाले की, ” विराट कोहली हा एक अनुभवी क्रिकेटपटू आहे. सध्याचा आयपीएलमध्ये तो भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याच्या स्ट्राइक रेटबाबत मात्र आम्ही चर्चा केली नाही. कोहलीच्या निवडीबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही.” कोहलीकडे अनुभव एवढा जास्त आहे की, त्याच्या स्ट्राइक रेटची चर्चा त्याला टी-२० संघात स्थान देताना झाली नसल्याचे आता आगरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोहलीचा स्ट्राइक रेट हा काही मोठा मुद्दा नसल्याचे निवड समितीला वाटत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Related News
विजय हजारे ट्रॉफी 2025: दिल्ली संघावर तणाव, कोहली आणि पंतसह संघाची घोषणा उशिरा
देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी 2025 सध्या सर्वां...
Continue reading
Mohammed Shami अद्याप टीम इंडियात का नाही? जाणून घ्या माजी कर्णधार सौरव गांगुली आणि निवड समितीचे दृष्टिकोन, शमीची शानदार कामगिरी, आणि आगामी क्रि...
Continue reading
IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, अंतिम सामन्यात एकदिवसीय मालिका ठरवणार
Continue reading
IND vs SA 3rd ODI : टीम इंडिया कशी जिंकणार सीरीज? विशाखापट्टणमच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड काय?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्य...
Continue reading
विराटचा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरं सलग शतक, विक्रमांची बरसात
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत विराट कोहलीने जबरदस्त फॉर्म कायम ठेवत सलग दुसरं शतक झळकावलं...
Continue reading
प्रेग्नेंट महिलेसोबत संसार थाटणारी लेस्बियन क्रिकेटर… कधीकाळी विराट कोहली याच्यासोबत लग्नाचं स्वप्न रंगवणारी डॅनी व्याट-हॉज करणार मातृत्वाचा आनंद साजरा!
एकेकाळी सोशल मीडियावर भारत...
Continue reading
गौतम गंभीरच्या आयुष्यातील वाईट वेळ; फॅन्सची खिल्ली, टीम इंडियाची अपेक्षा
भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी सध्या थोडा काळ तणावग्रस्त आहे. नुकत्याच संपलेल्या भारत-
Continue reading
गुवाहाटी टेस्टमध्ये भारताला सामना जिंकण्यासाठी मोठा आव्हान – द्योतक दिशेउद्देश जाणून घ्या की “Indian Bowling Collapse” ने कसे पकड मजबूत...
Continue reading
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय वनडे संघाची घोषणा; शुभमन गिल दुखापतीमुळे बाहेर, के. एल. राहुलकडे कर्णधारपदाची धुरा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या त...
Continue reading
गौतम गंभीर : प्रयोगांचा फायदा नाही, दीड वर्षात 7 फलंदाजांना नंबर 3 वर संधी, पण स्थिरता अद्याप मिळाली नाही
टीम इंडियाच्या हेड कोच गौतम गंभीर यांनी गेल्या ...
Continue reading
भारतीय क्रिकेट संघाला 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी मजबूत तयारी करण्याची संधी मिळेल
क्रिकेटच्या मैदानावर जिद्दी आणि खडूस खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार
Continue reading
विराट कोहली: क्रिकेट जगतातील 'रन मशीन'चे आठवणीय विक्रम
विराट कोहली हे नाव क्रिकेटच्या चाहत्यांसाठी फक्त एक खेळाडूच नाही, तर एक ब्रँड, एक युग आणि प्रेरणे...
Continue reading
कोहली धावा करत असला तरी त्याच्यापेक्षा अन्य खेळाडू हे जलदगतीने धावा करताना दिसतात. जिथे कोहलीला एका सामन्यात ६० धावा करण्यासाठी ४० चेंडू लागले होते, तिथे रजत पाटीदारने २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.त्यामुळे कोहलीवर टीका होताना दिसत आहे. आता तर कोहलीकडे ऑरेंज कॅपही राहिेलेली नाही. कारण ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप कोहलीकडून हिसकावत आपल्या नावावर केली आहे.
विराट हा चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याचा फायदा भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कपमध्ये होईल, असे भारताच्या निवड समितीला वाटत आहे.