मुंबई- सतत धावणाऱ्या मुंबईचा जीव म्हणजे मुंबई लोकल. दिवसाला लाखो करोडो नागरिक या ट्रेनच्या आधारे मुंबईच्या कानाकोपऱ्यात प्रवास करत असतात. ट्रेन थांबल्यावर पुढची १५ सेकंद किती महत्त्वाची आहेत हे फक्त मुंबईकरालाच ठाऊक. या १५ सेकंदात त्यांना त्यांच्या प्रवासाची दिशा गाठायची असते त्यामुळे रेलचेल करत, धक्काबुक्की करत या ट्रेनमध्ये चढण्याचा अट्टाहास सगळ्यांचा पक्का झालेला असतो.
गेल्या काही वर्षात महागाई आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमालीची वाढलेली पाहायला मिळते. ट्रेनमध्ये सीटवर बसणं सोडाच पण एका कोपऱ्यात निवांत उभं राहायला भेटणं हे देखील नशीबच म्हणावं लागतं.
ट्रेन मधून जाताना अनेकांचा एक मित्रपरिवार ही तयार होतो. घरात वेळ मिळाला नाही तर स्त्री वर्ग या लोकललाच आपला किचन चा ओटा बनवून तिथे भाजी साफ करण्याचं काम देखील करतात. बाहेर बाजारात मिळणाऱ्या गोष्टी ट्रेनमध्ये स्वस्त मिळतात म्हणून हे एक शॉपिंग सेंटर देखील असतं. अशी ही मुंबईची लोकल प्रत्येक मुंबईकराच्या जीवाभावाची असते.
Related News
Kriti Sanon : कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, रक्षाबंधन येताच घेतला मोठा निर्णय
अभिनेत्री Kriti Sanon गेल्या काही दिवसांपासून एक...
Continue reading
Mumbai : मुंबईत हुंडा छळाच्या तक्रारींमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ; मात्र हुंडाबळी आणि आत्महत्यांमध्ये मोठी घट
Mumbai : मुंबईत विवाहित महिलांच्या हुंड्यासा...
Continue reading
मुलाला केबिनबाहेर हुसकावले; पण तो पुन्हा आत आला अन् डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये नेमकं घडलं काय?
Kalyan Crime News : कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉ...
Continue reading
भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; ठाण्यात शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
कल्याण-डोंबिवली : महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा मो...
Continue reading
16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचं धक्कादायक कृत्य; पाठीमागून हात पकडला, जबरदस्तीने मिठी मारल्याचा आरोप
मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! टॉयलेटजवळ भाजी, काळे पडलेले पनीर; हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई
राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशास...
Continue reading
माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ...
Continue reading
मुंबईकरांसाठी मोठा धक्का! BEST कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण; बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बृहन्मुंबई विद्...
Continue reading
ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स; 1 तासात 1 लाख+ Views, VIDEO व्हायरल!
मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जोड्यांमध्य...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
5 फोटोंनी चाहत्यांना घायाळ! गुलाबी ड्रेसमध्ये माधुरी दीक्षितचं अप्रतिम सौंदर्य, साठीच्या उंबरठ्यावरही देतेय दमदार फॅशन गोल्स
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री
Continue reading
हर्षवर्धन राणे - संजीदाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण
हर्षवर्धन राणे-संजीदा शेखच्या नात्याची जोरदार चर्चा : बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच म...
Continue reading
सध्या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बहुतांश वेळी हा प्रवास नकोसा वाटतो पण पोटापाण्यासाठी समोर कोणताच पर्याय उरत नसल्याने रोज जीवावर बेतून हा प्रवास सुरूच असतो. बाहेर रस्त्यांवर हल्ली बेफाम ट्राफिक मिळते त्यामुळे सुद्धा प्रवासी लोकांना पसंती देतात.
आजकाल तर फक्त सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर टीव्ही सिनेमात काम करणारे कलाकार देखील आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे किंवा मेट्रोला पसंती देताना पाहायला मिळत आहेत.
किंबहुना आजच्या काळात स्टार म्हणून लोकप्रिय असलेले हे कलाकार त्यांच्या संघर्षाच्या काळात याच लोकल ने प्रवास करत असत.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हा टीव्ही इंडस्ट्रीजचा एक लोकप्रिय चेहरा. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ सोबतच त्यांनी दिलेलं कॅप्शन सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतयं. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या बेडवर झोपले आहेत आणि बॅकग्राऊंडला ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना ऐकू येते.
तसेच व्हिडिओवर त्यांनी कॅप्शनमध्ये डोंबिवली फास्ट मधून प्रवास करताना कळायचं… ही प्रार्थना शाळेत का शिकवली असे लिहिले आहे. म्हणजेच ऐश्वर्या ना म्हणायचं आहे की ट्रेनमधून प्रवास करत असताना देवा मला सुखरूप प्रवास करायची ताकद दे असं हे गाणं सुचित करतं.