बाळापूर: शासनाने गरिब आणि गरिबांसाठी घरकुल योजना राबवून, नियमांनुसार जागा देऊन घरे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तालुक्यातील ग्राम निंबा येथील किशोर गजानन तायडे यांनी बाळापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.तायडे यांनी आपल्या तक्रारात म्हटले आहे की, त्यांनी ग्राम पंचायत निंबा येथे घरकुल योजनेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्णता करून ऑनलाईन अर्जही केला होता. त्यानुसार, पंचायत समितीच्या यादीत त्यांचे नाव पीएम आवास योजनेत सामाविष्ट होते.पण नंतर ग्राम पंचायत यादीत त्यांच्या नावाची नोंद वगळण्यात आली. ग्राम सचिवालयाने विचारल्यावर तायडे यांना सांगण्यात आले की, त्यांच्या नावावर जागा नाही. मात्र, त्यांच्याकडे वडिलोपार्जित जागा असूनही, ग्राम विकास अधिकारी यांनी मनमानी केली आहे , त्यांचे नाव कमी केले असल्याचे तायडे यांनी आरोप केले आहेत.तायडे यांनी म्हटले की, त्यांच्या नावाऐवजी अन्य व्यक्तींच्या नावावर लाभ देण्यासाठी ग्राम अधिकारी तसे वागले असून, त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akolamadhyay-gachhivar-phullam-nandanvan-shekado-jhadamadhun-annual-millions/
