मुंबई : कांदिवली (पश्चिम) परिसरात एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. लालजीपाडा येथील तारकेश्वर महादेव मंदिरातील पुजाऱ्यावर एका तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप झाला असून, गुन्हा दाखल होताच पुजाऱ्याने मंदिरातच देवासमोर गळफास घेऊन जीवन संपवलं.मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गोस्वामी (वय 52, रा. ग्वालियर, मध्यप्रदेश) हा पुजारी गेल्या पाच वर्षांपासून मंदिरात पूजा-अर्चा करत होता. त्याने दर्शनासाठी येणाऱ्या एका तरुणीला आक्षेपार्ह संदेश पाठवून, पूजा करण्याच्या बहाण्याने घरात बोलावलं आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने आई-वडिलांना माहिती दिली. त्यांनी तातडीने कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.दरम्यान, गुन्हा दाखल होण्याची व बदनामीची भीती वाटताच राजेश गोस्वामीने मंदिरातच गळफास घेतला. पोलिसांनी ADR दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या प्रकरणाचा तपास सुरू असून, अजून किती तरुणींना त्रास दिला गेला आहे याचीही चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ind-vs-pak-pakistancha-palapachola-bharatacha-salg-vijay/