रायगड : चार जूनटीका करताना नेहमी भान असलं पाहिजे याचं भान या विकत आणलेल्या लोकांना असले पाहिजे. गाडी-माडीपर्यंत ठीक होते, चारचाकी लांबलचक गाड्या सगळ्यांच्या असतात. पण, ज्यांच्या समोर ही भाषणे झाली त्यांची कोणाची घरं कौलारू आहेत. पण, बायकोच्या सिल्क साडीपर्यंत कोण जात असेल तर मग आम्ही गप्प बसू का? असाही इशारा चाकणकर यांनी यावेळी सुषमा अंधारेंना दिला.
दुर्दैवाने देवाने त्यांना रूप उंची नसेल दिली, म्हणून मनामध्ये एक न्यूनगंड असतो की आपल्याला देवाने काहीच दिले नाही, पण मन तरी साफ असावं. पण, दुर्दैवाने ते मनही साफ नाही, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती टीका केली आहे.
त्यांनी (सुषमा अंधारे) ज्या वेळेला पक्षात प्रवेश केला त्यावेळी मनीषा कायदेंपासून नीलम ताई गोरेपर्यंत सगळ्यांनी पक्ष सोडला. याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. एक बाई पक्षात येते आणि बाकी सगळ्या महिला पक्ष सोडतात याचा अर्थ आपल्यामध्ये किती अवगुण असतील या सगळ्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. त्या दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन भाषण करतात आणि सांगतात, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला गुलाल लागणार नाही.
Related News
त्यांना टिकलीची किंमत नाही, त्यांनी तुमच्या गुलालाची भाषाच करू नये, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे यांना सुनावले आहे. २००९ मध्ये निवडणूक लढवत असताना ४४९ मतं घेतलेली महिला येथे येऊन सांगते की आपल्या कपाळावर गुलाल लागणार नाही, अशा शब्दात चाकणकर यांनी सुषमा अंधारे यांचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्राची आई तुळजाभवानी कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने शिवछत्रपतींनी या रायगडमध्ये शिवराज्याभिषेक केला, तर रायगडच्या मातीमधल्या माणसासाठी तुम्ही केलेली काम त्यांच्या असलेले प्रेम त्यांचा विश्वास तटकरे साहेब तुमच्या गप्पा वरती केवळ गुलालच राहणार नाही तर जेसीबीने पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुम्ही गुलालाने माखून निघाल, हा शब्द या जमलेल्या मातृशक्तीच्या वतीने आम्ही देऊ इच्छितो, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी तटकरे यांच्या कामाचं कौतुक करत विजयाची खात्री दिली.
ईर्शाळवाडीची घटना असेल महाडचा पूर असेल त्यावेळेला आम्ही पाहिलं तटकरे साहेब तुम्ही स्वतः तिथे गेला होतात लोकांच्या आनंदात आपण नाही गेले चालेल पण लोक दुःखात केलेली मदत विसरत नाहीत अशा शब्दात तटकरे यांच्या कामांचं रूपाली चाकणकर यांनी कौतुक केलं.
तुम्ही इतके चांगले काम करत असताना जर का अशा पद्धतीची कोणी टीका करत असेल तर ते रायगड असे सहन करणार नाही, असाही इशारा चाकणकर यांनी दिला. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी निवडणुका आल्या की राजकारण सुरू होतं. निवडणुका संपल्या की राजकारण संपतं, पण कुटुंबापर्यंत कोणी जाणार असेल तर ते राजकारणामध्ये सहन केले जाणार नाही, असाही इशारा रूपाली चाकणकर यांनी दिला.
ला निकाल लागल्यानंतर बारामतीमधील विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आम्ही रायगडचा गुलाल उधळायला येणार आहोत, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
तसेच, त्यांनी उद्धव ठाकरे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समाचार घेतला आहे.
स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही म्हणून ८३ वर्षाच्या बापाला फिरून लेकीसाठी मतं मागावी लागतात, अशा शब्दात चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना सुनावले आहे. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित रायगड जिल्ह्यातील सभेत रूपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आदिती तटकरे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती मतदारसंघांमध्ये लेक प्रचाराला फिरते जिथे वेळ मिळेल तिथे सांगते ‘दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लेकीसाठी बाप बुलंद कहाणी’, मला वाटतं आता हे बदललं पाहिजे.
पंधरा वर्ष सत्ता दिली, पण स्वतःची ओळख निर्माण करता आली ना, ही म्हणून ८३ वर्षाच्या बापाला फिरून त्यांना मतं मागावी लागतात. तटकरे साहेब तसं तुमचं नाही तुमची लेक स्वतःच्या हिमतीवर मतं मागते. तुमच्यासाठी लेख फिरते त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हाला अभिमान वाटतो की त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. स्वतःच्या माध्यमातून केलेली विकास काम करताना त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.