हेल्थ चेकअप कॅम्प यशस्वी

85 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

बार्शीटाकळी – स्थानिक अरबी मदरसा मिस्बाहुल उलूम येथील विद्यार्थ्यांसाठी खिदमते खल्क फाउंडेशनच्या वतीने आयोजित मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न झाला. या कॅम्पमध्ये होमिओपॅथिक औषधोपचारासोबतच आलोपथिक ट्रीटमेंटची सुविधा विद्यार्थ्यांना दिली गेली.

कॅम्पचा आयोजन मदरसा मिस्बाहुल उलूमचे मुख्याध्यापक मौलाना अब्दुल सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून याचा 85 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

कॅम्प यशस्वी करण्यासाठी डॉ. मोहम्मद फौजान मलिक, जनता ब्लड लॅबचे मोहम्मद असरार अहमद, हाफीज कारी बासित, साजिद खान, नूर खान, आतिफ खान पठाण, शेख जुनैद कुरैशी, सय्यद रेहान, सफवान खान, अब्दुल रहेमान, मोहम्मद शोएब, शेख जमीर कुरैशी यांच्यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांसाठी फ्री ब्लड चेकअपची सोय केली गेली तसेच त्यांना फळे देखील वितरित करण्यात आली, ज्यामुळे कॅम्पला मोठ्या प्रमाणात यश मिळाले.

read also :https://ajinkyabharat.com/capten-sunil-doba-yanchaya-gavat-plantation/