बाळापूर पोलीस स्टेशनवर निषेध

राजकीय वाद: राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजप आमदारांविरुद्ध संताप

बाळापूर: भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये राष्ट्रवादी (शप) गटाचे माजी मंत्री, जेष्ठ नेते व माजी प्रदेश अध्यक्ष जयंती पाटील यांच्यावर टीका करत त्यांच्या कुटुंबाचा अपमान केल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला.

बाळापूर तालुका अध्यक्ष शिवाजी म्हैसने नेतृत्वात कार्यकर्त्यांनी बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले. निवेदन सादर करत असताना नासिर खान, गजानन वजीरे, मोहम्मद असलम, सोहेल खान, सुखलाल अंभोरे, अकिल ठेकेदार आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांनी पडळकरांविरुद्ध निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादी (शप) कार्यकर्त्यांनी या घटनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/pravashanna-eight-days/