हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण

हरित महाराष्ट्रासाठी पोलीसांचा पुढाकार

हिवरखेड : हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला.या प्रसंगी अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी  निखिल पाटील, ठाणेदार  गजानन राठोड, पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिलेश्रीराम जाधव, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तेल्हारा तालुका सदस्य  महेंद्र भोपळे, पत्रकार बांधव व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरणपूरक उपक्रम

या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी पोलीस प्रशासनासह स्थानिक समाजकार्यकर्त्यांनी योगदान दिले. वृक्षारोपणामुळे परिसर सुशोभित होणार असून नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळण्यास मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. हिवरखेड पोलीस स्टेशनचा हा पर्यावरणपूरक उपक्रम हरित महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/social-responsibility-janiiv/