अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा नियमात मोठे बदल केले आहेत. यामध्ये व्हिसा फी जवळपास 83 लाख रूपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.
यामुळे अनेक कंपन्यांनी आपले H-1B व्हिसा धारक कर्मचारी ताबडतोब अमेरिकेत परत येण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचा मेल व्हायरल झाला असून, त्यात कर्मचार्यांना “अमेरिकेतच राहा” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावणे, चाबहार बंदरावर निर्णय घेणे यासह H-1B नियम बदलणे हे भारतासाठी गंभीर धक्का मानले जात आहे. टेक कंपन्यांचे कर्मचारी आत्ताच अडचणीत आहेत, कारण व्हिसा नियम बदलल्यामुळे अमेरिकेत येण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
यावेळी जगाची नजर ट्रम्पच्या निर्णयांवर असून, भारताशी धोरणात्मक संबंध आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रभाव काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
read also :https://ajinkyabharat.com/80-tarunani-banana-blood-donation/
