बच्चू कडू यांची शेतकरी हक्क सभा

कर्जमाफीसाठी आंदोलनाची हाक

माळेगांव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता प्रहार जनशक्तीचे माजी पालक मंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी हक्क सभा पार पडली. सभेची सुरुवात चंपामाता मंदिरापासून सजवलेल्या बैलगाडीतून शोभायात्रा काढून करण्यात आली.

सभेत बच्चू कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून शेतकऱ्यांना संबोधले. भाषणात त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांची चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, राज्यातील एकही शेतकरी नफ्यात नाही, औषधे व खाते महागली आहेत, सोयाबीन आणि कपाशीचे भाव कमी केले जात आहेत. कर्जबारी शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

बच्चू कडू यांनी येत्या 28 तारखेला होणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान केले व म्हटले, “जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.” सभेत प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे, कार्यकर्ते आणि पंचकोशिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

read also :https://ajinkyabharat.com/chahtamadhyay-anandachi-lat/