चाहत्यांमध्ये आनंदाची लाट

पहिला फोटो व्हायरल,

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ वयाच्या 42 व्या वर्षी आई होणार आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना आणि अभिनेता विकी कौशल त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. सध्या सोशल मीडियावर कतरिनाचा प्रेग्नेंसीचा पहिला फोटो तुफान व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या गाउनमध्ये दिसत असून तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसत आहे. रेडिटवर एका युजरने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “कतरिना कैफचा नवीन BTS फोटो पहा, जो जाहिरातीसारखा दिसतो.”

या फोटोच्या प्रकाशनानंतर चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. अनेकांनी कतरिनाला शुभेच्छा दिल्या असून तिच्या आगामी आई होण्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.

कतरिना आणि विकी यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी लवकरच चाहत्यांसोबत “गुड न्यूज” शेअर होण्याची शक्यता आहे.

read also :https://ajinkyabharat.com/world-hindu-parishdechi-information/