सुरेखा यादव 36 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

आशियातील पहिली महिला लोकोपायलट

आशियातील पहिल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव यांनी 36 वर्षांच्या दिर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली आहे. 1988 मध्ये भारतीय रेल्वे सेवेत रुजू झाल्या तेव्हापासून त्यांनी अनेक प्रसिद्ध गाड्यांचे संचालन केले आहे.

सुरेखा यादव यांनी डेक्कन क्वीन, मुंबई लोकल आणि वंदे भारत एक्सप्रेससह अनेक ऐतिहासिक रेल्वे गाड्या चालवल्या आहेत. 2000 मध्ये ‘फर्स्ट लेडी ड्रायव्हर’ बनून त्यांनी मुंबई लोकलचे संचालन केले. तर 2023 मध्ये मुंबई-सोलापूर दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चालवून त्यांनी नवीन विक्रम प्रस्थापित केला.

त्यांच्या निवृत्तीने रेल्वे क्षेत्रात एका युगाचा समारोप झाला आहे. रेल्वे प्रशासन आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. सुरेखा यादवचा रेल्वे क्षेत्रातील वाटचाल अनेक महिला लोकोपायलटसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/shahrukhskabat-photo-share-karoon-message/