कोट्यवधी एलपीजी ग्राहकांना 22 सप्टेंबरनंतर पुन्हा गुडन्यूज मिळेल का, यावर चर्चा सुरु आहे. कारण जीएसटी कपातीमुळे अनेक वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम होणार आहे.
घरगुती एलपीजी गॅसवर काय परिणाम?
घरगुती एलपीजी सिलेंडरवर 22 सप्टेंबरपासून 5% जीएसटी लागू राहणार आहे.
सबसिडी असलेल्या आणि नसलेल्या घरगुती सिलेंडरवर दर समान – 5% जीएसटी.
म्हणजे घरगुती ग्राहकांसाठी काहीही किंमतीत घट होणार नाही.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर काय बदल?
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर 22 सप्टेंबरपासून 18% जीएसटी लागू होणार आहे.
त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल व अन्न उद्योगातील ग्राहकांना देखील कोणताही दिलासा मिळणार नाही.
ग्राहकांची नाराजी
गेल्या काही वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमती दुप्पट झाल्यामुळे ग्राहकांत नाराजी आहे.
नवीन GST दरांमुळे घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसणार नाही, असा निष्कर्ष आहे.22 सप्टेंबरनंतरही घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही फरक दिसणार नाही. ग्राहकांनी या GST बदलांबाबत अपेक्षा कमी ठेवावी.
