जि.प. प्राथमिक शाळा अनई येथे स्वागत-सत्कार व निरोप समारंभ संपन्न

प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद नाखले यांचा सत्कार

कारंजा (लाड) : कारंजा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी स्वागत-सत्कार व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात नव्याने रुजू झालेले तसेच बदलीने शाळेतून जाणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मंडळ अधिकारी नाना मुंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रहेमान नंदावाले, प्रदेश सहसचिव अ‍ॅड. सुभान खेतीवाले, माजी शिक्षण मंडळ सदस्य प्रा. सी.पी. शेकूवाले, पूर्व प्राचार्य बद्रोद्दिन कामनवाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष युसुफ खेतीवाले यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेसाठी अनेक वर्षे सेवा देणारे प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद नाखले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. तर नव्याने रुजू झालेले प्रभारी मुख्याध्यापक राऊत यांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांविषयीचे आपले अनुभव व्यक्त केले तर मान्यवरांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या.निरोप देण्यात आलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वितरण करून त्यांचे आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक युसुफ खेतीवाले यांनी केले. या प्रसंगी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/aichya-tahon-gondigav-sunn-gavakyanchaya-doyant-ashrau/