बाळापूर – महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सेवा पंधरवडा कार्यक्रमाची अमलबजावणी तालुक्यात यशस्वीरित्या झाली. कार्यक्रमात खिरपुरी खुर्द आणि ऊरळ बु येथील शेतकऱ्यांसाठी रस्ते सुधारणा आणि शासकीय योजना कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.खिरपुरी खुर्द गट ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत बाळापूर तहसिलदार वैभव फरतारे, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी रीना मिश्रा, कृषीसहायक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शेतकरी आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. या वेळी गावातील शासकीय रस्त्यांची यादी वाचण्यात आली आणि कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.त्याचबरोबर ऊरळ बु येथे नायब तहसीलदार सागर भागवत यांनी पंधरवाडा अंतर्गत पांदण रस्त्याची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना कामाची अमलबजावणी करून न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.तालुक्यातील या पंधरवाडा कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना रस्ते व इतर सुविधा लवकर उपलब्ध होतील याची खात्री कार्यशाळेतून मिळाली.
read also : https://ajinkyabharat.com/bhujba-mhanale/
