29 प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराची संधी

ग्रामीण तरुणांसाठी मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण

अकोला. – डोंगरगाव आशिष इंगळे: ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि सेंट्रल बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ऑगस्ट 2025 ते 12 सप्टेंबर 2025 दरम्यान 30 दिवसांचे मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 18 ते 45 वयोगटातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

प्रशिक्षणाच्या दरम्यान मुलांनी आपले ग्राहक शोधून मोबाईल दुरुस्त करणे सुरू केले असून, त्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळाली. प्रशिक्षार्थ्यांनी सांगितले की मोबाईल ही आजची प्राथमिक गरज असल्यामुळे या प्रशिक्षणामुळे स्वतंत्र रोजगार व ओळख निर्माण करण्यास मदत झाली आहे.

संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून, सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास आणि जेवणाची सोय देखील संस्थेने केली होती. एकूण 29 प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

प्रशिक्षक म्हणून प्रमोद नामदास सर, सातारा, तसेच उद्योजक कला विकासाचे धडे संस्थेचे संचालक विद्याशंकर सर आणि प्रशिक्षक श्वेता मॅडम यांनी दिले.

हा उपक्रम ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी सौर रोजगाराची उत्तम संधी ठरला आहे.

read also :https://ajinkyabharat.com/dindy/