दिल्ली :टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशिष कपूर बलात्काराच्या गंभीर आरोपांमुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. दिल्लीतील हाऊस पार्टीत एका महिलेनं त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. पुण्यातून अटकेनंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता कोर्टाने आशिषला १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, यानंतर त्याने पहिल्यांदाच मौन तोडत प्रतिक्रिया दिली आहे.
इन्स्टाग्रामवरून दिली प्रतिक्रिया
आशिषने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिलं –
“माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. या अनुभवातून मला आपल्या लोकशाहीची ताकद आणि न्यायव्यवस्थेची महती समजली. मला सुरुवातीपासूनच विश्वास होता की सत्याचा विजय होईल आणि आज तो सिद्ध झाला आहे. या कठीण काळात ज्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांचे मी आभार मानतो.”
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिलेची आणि आशिषची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती.
त्यानंतर तिला दिल्लीतील मित्राच्या घरी पार्टीला बोलावलं.
पार्टीदरम्यान आशिषने तिला बाथरूममध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळल्याचं आणि तक्रार केल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचंही महिलेनं पोलिसांना सांगितलं.
कोर्टाचा निर्णय
६ सप्टेंबर रोजी अटकेनंतर आशिष कपूरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र वकिलांच्या युक्तिवाद, सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे तपासल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी तुरुंगात ठेवणं आवश्यक नाही असा निष्कर्ष निघाला. त्यामुळे १० सप्टेंबर रोजी कोर्टाने जामीन मंजूर केला.
आशिष कपूरबद्दल माहिती
जन्म : १७ ऑक्टोबर १९८४, दिल्ली
प्रसिद्ध मालिका : बंदिनी, सरस्वतीचंद्र, वो अपना सा, लव्ह मॅरेज, प्रतिज्ञा २, ये रिश्ता क्या कहलाता है
टेलिव्हिजनवरील ओळख : रोमॅंटिक आणि कॅरेक्टर रोलमधील लोकप्रिय चेहरा
read also :https://ajinkyabharat.com/clash/
