पाकिस्तानचा संघ पुन्हा नाटकीपूर्वक मैदानाकडे

मैदानाकडे निर्लज्ज रवाना"

दुबई  : आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने पुन्हा एकदा नाटकी प्रवृत्ती दाखवली आहे. युएईशी होणाऱ्या सामन्यापूर्वी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट असल्यामुळे पाकिस्तान संघाने सुरुवातीला सामना खेळण्यास नकार दिला होता.सुरुवातीला संघ हॉटेलवरच थांबला होता आणि पाकिस्तान मीडियाने देखील दावा केला होता की संघ सामना खेळणार नाही. मात्र अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पलटी मारली आणि संघ मैदानाकडे रवाना झाला. त्यानुसार हा सामना अंदाजे एक तास उशिराने सुरु होणार आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सामन्यानंतर आयसीसीकडे अँडी पायक्रॉफ्ट यांची तक्रार केली होती आणि त्यांना स्पर्धेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. परंतु आयसीसीने ही मागणी नाकारली होती आणि युएईविरुद्धच्या सामन्यात अँडी पायक्रॉफ्टच सामनाधिकारी राहणार असल्याचे स्पष्ट केले.पाकिस्तान मीडियाच्या माहितीनुसार, पीसीबीचे अधिकारी मोहसिन नक्वी आणि रमीझ राजा यांच्यात सामन्यापूर्वी चर्चा सुरु होती.

पाकिस्तानने आयसीसीकडे दोन मागण्या ठेवल्या आहेत – 

१. भारताविरुद्ध सामन्यात सामनाधिकारी असलेल्या अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागावी.
२. भारतीय संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव याला दंड ठोठवावा, कारण त्यांनी पहलगामचा उल्लेख करत राजकीय संदर्भ दिला.

पाकिस्तानने हा सामना खेळला नाही तर त्यांचे आशिया कपमधील आव्हान संपुष्टात येईल आणि युएईला सुपर ४ फेरीसाठी तिकीट मिळेल. मात्र पुन्हा एकदा निर्लज्जपणे मैदानाकडे रवाना होणाऱ्या पाकिस्तान संघाने क्रीडाप्रेमींमध्ये प्रश्न निर्माण केला आहे की, “जर सामना खेळायचाच होता, तर इतकी नाटकी का?”

read also : https://ajinkyabharat.com/vadddivasimitt-shetkari-bandwanani-risodamadhye-environmental-untra-rabwala/