रिसोड – भारताचे जागतिक नेतृत्व करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रिसोड येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भाजप उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव लखनसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी वृक्षारोपण संकल्प स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी ७५ वृक्षारोपण केले.हा पर्यावरणपूरक उपक्रम लोणी रोडवरील बस स्थानकापासून लोणी फाट्यापर्यंत विविध प्रजातींची झाडे लावण्याच्या माध्यमातून राबवण्यात आला. जवळपास शंभर शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सर्व शेतकऱ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात आपापल्या शुभहस्ते वृक्षारोपण केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जोरदार घोषवाक्यांनी वातावरण प्रेरणादायी केले.वृक्षारोपणात सहभागी शेतकरी बांधवांमध्ये महावीर सिंह पवार, राजेंद्र वसंतराव देशमुख, अमोल जनार्दन देशमुख, लखन देशमुख, बाळासाहेब भोसले, विद्याधर दामोदर मोरे, शिवलाल देवीचंद बिजोरे, संजय आनंदा अंभोरे, दिलीप प्रल्हाद अंभोरे, नितीन मधुकरराव देशमुख, जगन्नाथ सखाराम ढोले, हरीगीर अंबरगीर गिरी, कडूजी सिताराम पंजरकर, हरिगिरी गिरी, देविदास तिरके, मोतीरामजी पंजरकर, पुरुषोत्तम बाजीराव मोरे, कैलास प्रभू अंभोरे, मधुकर नरहरी मोरे, प्रकाश राजाराम मोरे, मधुकर लक्ष्मण विटकर, संजय राघोजी बिजोरे, माधव धोंडूची मापारी, सुधीर विनायक मोरे, दामोदर मुकुंदा गरड, धनंजय विठ्ठल मोरे, बेबीबाई गणेश बिजोरे, विश्वंबर मोरेश्वर मोरे, अशोक सुधाकर राव देशमुख, गजानन विनायक मोरे, राजेंद्र विनायक मोरे, गजानन भगवानराव देशमुख, संजय भगवानराव देशमुख, महादेव लक्ष्मण डहाके, सुरेशराव देशमुख, सुनील नारायणराव लाटे, अरुण यादवराव अंभोरे, मधुकर संपत कावरखे, शेषराव गरड, भागीरथीबाई राजाराम मोरे, सफिया बी सलीम खान पठाण, वंदना मधुकर मोरे, निलेश मधुकर मोरे, इरफान खान महबूब खान पठाण, शेख इब्राहिम बाबुभाई सह अनेक शेतकरी बांधवांचा समावेश होता.या कार्यक्रमात उपस्थित भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक शेतकरी बांधव, मित्रमंडळी आदी सर्वांनी सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योगदानाचा अभिमान व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्धार व्यक्त केले.
read also : https://ajinkyabharat.com/sbi-life-bonanjha-aybc-sports-ambodachi-women-thali-wijeti/
