एसबीआय लाईफ बोनान्झा आयबीसी स्पर्धेत आंबोडाची महिला ठरली विजेती

आंबोडा येथील पल्लवी रंदे एसबीआय लाईफ स्पर्धेतील विजेती

अकोला – एसबीआय लाईफने विदर्भ प्रदेशात मान्सून बोनान्झा आयबीसी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अकोला शाखेतील प्रतिनिधी म्हणून अकोट तालुक्यातील आंबोडा येथील पल्लवी मनोज रंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी सादर करत लेवल वन मध्ये स्थान मिळवले आहे.एकूण सहा महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धकांमध्ये पल्लवी मनोज रंदे यांचे प्रदर्शन खास ठरले व त्यांनी विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेचा पुरस्कार समारंभ अमरावती येथील मनभवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात एसबीआय लाइफचे एरिया मॅनेजर विनय दधानिया आणि व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांनी पल्लवी रंदे यांना सन्मानित करून सत्कार केला.एसबीआय लाईफच्या या मान्सून बोनान्झा आयबीसी स्पर्धेचा उद्देश व्यवसायिक कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे, नव्या योजनांची माहिती व सल्ला ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि महिला प्रतिनिधींना पुढे आणण्यावर भर देणे हे होते.पल्लवी मनोज रंदे यांचे कौतुक करत कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे स्थानिक स्तरावर अभिमानाची लहर पसरली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/buddhist-religious-place-muktisathi-motha-janakrosh-morcha/