अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन हद्दीतील वीरगव्हाण गावात मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील ध्रुव राठोड नावाचा अल्पवयीन मुलगा दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. आज त्याचा मृतदेह गावाजवळील शेतातील शेततळ्यात पाण्यात आढळून आला.ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पाचवीत शिकणारा ध्रुव राठोड हा सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत खेळताना गावाजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला असावा. मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो बुडाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेली इतर मुले भीतीने घटनास्थळावरून निघून गेल्याची शक्यता आहे.सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/administrative-role-of-ughdakis-yenar/
