उर्दू शिक्षक आणि व्यापारी मित्राची एटीएसने केली चौकशी

उर्दू शिक्षक

नागपूर: पाकिस्तानसोबत व्हॉट्सॲप संबंधीत

नागपूर – दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे जुनी कामठी भागातील एका उर्दू शिक्षकासह दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. पाकिस्तानमधील जिहादी व्हॉट्सॲप ग्रुपशी त्यांचा संबंध असल्याचे समोर आले आहे.42 वर्षीय शिक्षक एका प्रसिद्ध उर्दू शाळेत कार्यरत असून तो यूट्यूब चॅनल चालवतो. तो गेल्या 10 वर्षांपासून पाकिस्तानमधील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सक्रीय होता, ज्यात 500 हून अधिक सदस्य आहेत. त्याचा 40 वर्षीय व्यापारी मित्रही या ग्रुपशी जोडला गेला आहे. चौकशीत दोघांनी सोशल मीडिया ॲपवर पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधल्याचे निष्पन्न झाले.गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, ग्रुपवर पाकिस्तानी लष्करी कारवाईचे महिमामंडन करणारे व्हिडिओ, धार्मिक मजकूर, भारतीय सशस्त्र दलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या आणि बहुसंख्याक समुदायाविरुद्ध पोस्ट टाकल्या जात होत्या.दोघांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांच्या मोबाईल डेटा जप्त करून त्यांना सोडण्यात आले. मात्र, त्यांच्यावर अजूनही पाळत ठेवली जात असून गरज भासल्यास परत चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.सरकारने राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी डिजिटल मॉनिटरिंगला प्राधान्य दिले असून, अशा परदेशी संबंध असलेल्या ग्रुप्सवर लक्ष ठेवण्यासाठी एटीएस आणि एनआयए प्रगत डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या संभाव्य हानिकारक मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील एजन्सींना निर्देश दिले आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/akola-district-magistrate-office-morobc-reservation/