भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी

संतोष जगदाळेंची मुलगी संतापली

मुंबई – पहलगाम येथील २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे संतोष जगदाळे शहीद झाले. त्यानंतर केवळ सहा महिन्यांतच भारत-पाकिस्तानमधील आशिया कप २०२५ चा सामना होणार असल्याचे कळताच त्यांच्या मुली आसावरी जगदाळेंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आज, १४ सप्टेंबर रोजी दुबईत हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला विरोध व्यक्त करत आसावरी म्हणाली, “आजचा सामना आमच्या भावनांशी खेळ आहे. अजून सहा महिन्याही झाले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानसोबत सामना खेळत आहात. या देशातून दहशतवादी आमच्या लोकांना मारतात. अशा परिस्थितीत सामना खेळणे योग्य नाही.”

तिने पुढे म्हटले, “आपल्या देशात यायचे नाही आणि आपण त्यांच्या देशात जायचे नाही म्हणून तुम्ही सामना दुबईत ठेवता. हे अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठिंबा देण्यासारखे आहे. जर खरोखर शहीद झालेल्या लोकांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती असेल, तर अशा प्रकारचे सामने होऊ नयेत.”

संतोष जगदाळेंच्या मुलीची ही प्रतिक्रिया भारत-पाकिस्तान सामन्यावरून निर्माण झालेल्या संतापाचे प्रतिबिंब आहे. अनेकांना आश्चर्य वाटते की, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर का या देशाबरोबर सामना ठरवला जात आहे.

read also :https://ajinkyabharat.com/satyavar-based-nahi/