कारंजा (लाड) : कारंजा शहरातील हसमणी परिसरात आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली आहे. एका घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या घटनेने परिसरात मोठा अस्वस्थता पसरली आहे.
चोरी झालेल्या घरात एकूण १५ सदस्य होते जे हज यात्रेसाठी गेले होते. परत आल्यावर घराचा मुख्य दरवाजा उघडल्यावर सर्वजण स्तब्ध झाले. घरातील पलंग अस्ताव्यस्त अवस्थेत असून लोखंडी कपाटाच्या तिजोरीतून ७० हजार रुपये गायब असल्याचे लक्षात आले.
सीसीटीव्ही कॅमेरा बसवले असतानाही चोरट्यांनी हुशारीने मागच्या बाजूच्या लोखंडी पिंजऱ्याचा वापर करून गॅलरीतील दरवाजा तोडून चोरी केली आहे. या घटनेची तक्रार हसमणी कुटुंबाच्या प्रमुखाने कारंजा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मेमन कॉलनी परिसरात एका शिक्षक दाम्पत्याच्या घरात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे गस्त वाढवण्याची मागणी केली होती.
सध्याच्या चोरीच्या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासनाने ही गंभीर घटना गांभीर्याने घेऊन तत्काळ चौकशी सुरू केली असून चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
read also :https://ajinkyabharat.com/certificate-certificate/
