जवानाची रायफल-पाटी पळवली

मुंबईत नौदलाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात घुसखोरी;

मुंबई – मुंबईच्या कुलाबा भागात 6 सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने भारतीय नौदलाचा गणवेश घालून ड्युटीवर असलेल्या अग्निवीरची रायफल आणि काडतुसे पळवली.

मिळालेल्या माहितीनुसार, घुसखोर व्यक्तीने अग्निवीरला सांगितले की, “तुझी ड्युटी संपली आहे, तू आराम कर,” आणि रायफल हातात घेऊन काही वेळात पळ काढला. अग्निवीरला या व्यक्तीची ओळख नव्हती, कारण त्याने नौदलाचा अधिकाऱ्याचा गणवेश परिधान केला होता. काही वेळातच समजले की, हा व्यक्ति नौदल अधिकारी नाही.

या घटनेनंतर नौदल, एटीएस आणि मुंबई पोलिसांना तत्काळ सतर्क करण्यात आले. घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले, पण अद्याप घुसखोराचा शोध लागलेला नाही. कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई नौदलाकडून या प्रकरणाची चौकशीसाठी विशेष समिती गठीत करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने तपास सुरू आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, आणि घुसखोराचा शोध लागण्यासाठी सविस्तर पद्धतीने तपास सुरू आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/napamadhyay-social-media-prisoners-gen-z-cha-violent-prohibition/