बस प्रवासादरम्यान एका महिलेकडून दागिने चोरी झाल्याच्या प्रकरणी अखेर तिसऱ्या दिवशी मालेगाव पोलीस स्टेशनला झिरो FIR अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किनखेडा माहेर असलेली एक विवाहिता महालक्ष्मी, आपल्या दोन लहान मुलांसह सासरी जाण्यासाठी दि. ६ सप्टेंबर रोजी अकोला जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करत होती. बस भरलेली असताना अज्ञात व्यक्तीने तिच्या अलगद बॅगेतून दागिने काढून घेतले. अकोला बसस्टॅण्डवर उतरल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.महिलेला अकोला बसस्टॅण्ड पोलिस चौकीत तक्रार करण्याचे सुचवण्यात आले. मात्र चौक पोलिस स्टेशन आणि सिविल लाईन पोलिस स्टेशन यांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली. अखेरीस मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये तिन्ही दिवसांनी गुन्हा नोंदवण्यात आला.सदर प्रकरणात पोलिस कारवाई कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/punda-yehehe-public-ganeshotsav-mandalanchi-miravanuk-kantate/
