“४६ मंडळांचा सहभाग, ड्रोन-सीसीटीव्हीने पाहिले शहराचे गणेश विसर्जन!”

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”

अकोट: अकोट शहरात गणेशोत्सवाचा समारोप भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. मिरवणूक दुपारी एक वाजता सुरू झाली आणि रात्री दहा वाजता शांततेत संपली. या मिरवणुकीत एकूण ४६ मंडळांनी सहभाग घेतला.मिरवणुकीत विविध मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात, डी.जे., ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आताषबाजीत करण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक सजावट, रांगोळ्या आणि रोषणाई करण्यात आली होती. युवक-युवती लेझीम, ढोल-ताशे, झांज व नृत्याच्या तालावर सहभागी झाले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.मिरवणूक दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही, साध्या गणवेशातील पोलीस पथक आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, ३७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५३७ पोलीस कर्मचारी, ११० होमगार्ड, महिला होमगार्ड, एस.आर.पी.एफ., आर.सी.पी. तसेच महावितरण अधिकारी, कर्मचारी आणि अकोट महसूल विभाग, नगर परिषद, सार्वजनिक गणेशोत्सव समिती तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.नागरिकांचा सहभाग प्रचंड होता आणि विसर्जन घाटावर सुरक्षा, स्वच्छता व गर्दी नियंत्रणासाठी सर्वव्यापी व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणूक संपूर्ण शहरासाठी आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/hyderabad-gazhetan-according-to-reservation-milanyachi-shevatchi-sandhi/