पत्नी आशा गवळीची भावूक पोस्ट व्हायरल

पत्नी

मुंबई: अंडरवर्ल्डचा एकेकाळी मोठा नाव असलेला अरुण गवळी, ज्याला मुंबईतील गल्ल्यांमध्ये मोठ्या भीतीने घेतलं जायचं, आज 17 वर्षांच्या तुरुंगवासानंतर स्वतःच्या घरी परतला आहे. त्यांच्या या परतीवर पत्नी आशा गवळी यांनी भावनिक पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.आशा गवळी यांनी व्हिडीओ पोस्टमध्ये सांगितले, “आज आनंदी आनंद झाला… आज माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण माझे पती, डॅडी, 17 वर्षांच्या संघर्षानंतर आज स्वगृही परतले आहेत. हा क्षण फक्त माझ्यासाठी नव्हे, तर आपल्या परिवारासाठी आणि डॅडीच्या चाहत्यांसाठीही खूप खास आहे.”तिने पुढे म्हटले, “इतके वर्ष डॅडी आपल्या परिवारासोबत राहण्यासाठी संघर्ष करत होते. पण म्हणतात ना, ‘भगवान के घर देर है अंधेर नहीं.’ त्यांनी जो संयम आणि सहनशीलता राखली आणि भगवंतावर विश्वास ठेवला, त्यामुळे आजचा आनंदाचा क्षण द्विगुणित झाला. दुःख काय असते हे डॅडीच समजू शकतात आणि त्यांनी जे सहन केलं, ते कोणीही करू शकत नाही. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच माझी प्रार्थना.”सध्या आशा गवळी यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून अनेक चाहत्यांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अरुण गवळी का तुरुंगात होते?
अरुण गवळी यांना 2007 च्या कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणात दोषी ठरवून तुरुंगाची शिक्षा झाली होती. सप्टेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. 17 वर्षांच्या तुरुंगवासानंतर भायखळा येथे परतलेल्या गवळी यांचं फुलांनी आणि उत्साहाने स्वागत करण्यात आलं.मुंबईतील अनेक चाहत्यांनी त्यांना गळा घालून स्वागत केले, तर कुटुंबीयांच्या भावनिक क्षणांनी उपस्थितांना देखील भावूक केलं. अरुण गवळीच्या या परतीने मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि स्थानिक समाजात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/american-c17-aircraft-pakistanchaya-airbasevar/