मनोज वाजपेयीच्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ टीमचं सिद्धिविनायकात बाप्पा दर्शन

‘इन्स्पेक्टर झेंडे’ टीमचं सिद्धिविनायकात बाप्पा दर्शन

मनोज वाजपेयीच्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ टीमचं सिद्धिविनायकात बाप्पा दर्शन

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात बॉलिवूडही रंगलेलं दिसत आहे.

अभिनेता मनोज वाजपेयीच्या आगामी ‘इन्स्पेक्टर झेंडे’

या चित्रपटाची टीम सोमवारी मुंबईतील प्रसिद्ध

सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाली.

या वेळी मनोज वाजपेयीसोबत दिग्दर्शक ओम राऊत आणि

चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते. चित्रपटाच्या यशासाठी सर्वांनी श्री गणेशाचे आशिर्वाद घेतले.

इन्स्पेक्टरच्या जीवनावर आधारित कथा

‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे.

कर्तव्यदक्षता, धैर्य आणि सेवाभावाने काम करणाऱ्या या पात्राच्या प्रवासाची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

बाप्पाच्या चरणी आशीर्वाद

गणेशोत्सवाच्या पावन वातावरणात या टीमने आपल्या कामासाठी अखंड ऊर्जा,

धैर्य व कर्तबगारीसाठी बाप्पाचं आशिर्वाद घेतलं. या दर्शनाचा क्षण टीमसाठी

केवळ धार्मिक विधी न राहता सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आशिर्वादाचं प्रतीक ठरला.

Read also : https://ajinkyabharat.com/gold-and-silver-molest/