दिल्ली – टीम इंडियाचा तडाखेबाज खेळाडू ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मात्र, यावेळी कारण त्याचा खेळ नव्हे तर एका सुंदरीचं त्याच्यावरचं प्रेम आहे.
दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये सध्या या ललनेचा जलवा सुरू असून तिच्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे.
ही तरुणी आहे तरी कोण?
खरं तर, ही सुंदरी ऑस्ट्रेलियाची असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर
ती भारतात आपल्या कामानिमित्त आली आहे.
सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर जोरदार
व्हायरल होत असून चाहते तिच्या स्टाईलवर फिदा झाले आहेत.
हेडनची मुलगी!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी दुसरी तिसरी कोणी
नसून ऑस्ट्रेलियाच्या माजी स्टार सलामीवीर मॅथ्यू हेडनची मुलगी असल्याचं समोर आलं आहे.
हेडनची कन्या सध्या दिल्ली प्रीमिअर लीगच्या सोहळ्यात सहभागी
झाली असून तिच्या उपस्थितीमुळेच स्पर्धेपेक्षा तिचीच चर्चा रंगली आहे.
ऋषभ पंतवरील प्रेम
तिचं मन मात्र टीम इंडियाच्या तरुण विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतवर आलं आहे.
तिच्या जवळच्या मंडळींच्या मते, ती पंतच्या खेळावर आणि व्यक्तिमत्त्वावर फिदा झाली आहे.
सोशल मीडियावर तिच्या पोस्ट्समधूनही हे संकेत मिळत आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/nashik-hadhilal-pahilya-wife/