नवी दिल्ली –भारतावर टॅरिफ लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या
डोनाल्ड ट्रम्प सरकारला आता मोठा धक्का बसला आहे.
रशिया आणि चीनसोबत भारताची वाढती जवळीक पाहता
अमेरिका माघार घेताना दिसत आहे.
थेट भारताबद्दल आगीत तेल ओतणारी भाषा करणारी अमेरिका,
आता मात्र “भारत–अमेरिका मैत्री”ची आठवण काढताना दिसते.
भारताचा रशियासोबतचा करार – अमेरिकेला धक्का
भारताने अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता रशियासोबत महत्त्वाचे करार केले.
याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे
तिघेही एससीओ शिखर संमेलनात एकत्र दिसले.
या भेटीने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली.
अमेरिकेला अपेक्षित असलेली भारताची माघार उलट
न मिळाल्याने त्यांचा दबावच फसल्याचे स्पष्ट होत आहे.
अमेरिकेचा सूर बदलला
भारताबाबत “रशियाचे कपडे धुणारे” अशी उपरोधिक भाषा वापरणारी
अमेरिका आता मात्र ताळ्यावर आली आहे.
नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने सोशल
मीडियावर भारत-अमेरिका मैत्रीबद्दल मोठी पोस्ट टाकली आहे.
“भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही 21 व्या शतकातील परिभाषित करणारी मैत्री आहे.
या नात्याचा पाया दोन्ही देशांच्या लोकांमधील दृढ संबंधांवर आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्र्यांचे निवेदन
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले की,
“भारत आणि अमेरिकेतील लोकांमधील ही खोल मैत्रीच आमच्या भागीदारीचा पाया आहे.
हाच पाया आम्हाला पुढे नेत असून आर्थिक भागीदारीतील अफाट शक्यता साकारत आहे.”
भारताची भूमिका ठाम, अमेरिकेची माघार
रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यात आला होता.
मात्र, भारताने तो दबाव धुडकावून लावत रशियासोबतचे संबंध अधिक घट्ट केले.
यामुळेच अमेरिकेची भाषा बदलल्याचे आता उघड होत आहे.
मोदी–पुतिन–शी भेटीनंतर अमेरिकेच्या कपाळावर आठ्या, पण भारत मात्र आपल्या मार्गावर ठाम!
Read also :https://ajinkyabharat.com/pati-wife-aani-wo-tighehi-polis-dalat-affier-ughd-jhalya-department-khab/
