Trump Is Dead’ ट्रेंडने खळबळ; ट्रम्प यांच्या आरोग्यावरून चर्चेला उधाण

‘Trump is Dead’ ट्रेंडने खळबळ

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत

सोशल मीडियावर शनिवारी पुन्हा एकदा चर्चा रंगली.

X (माजी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर “Trump Is Dead” हा हॅशटॅग व्हायरल झाला असून,

ट्रम्प यांच्या मृत्यूबाबत तब्बल ६० हजारांहून अधिक पोस्ट्स शेअर झाल्या.

जुलै महिन्यात त्यांच्या उजव्या हातावर काळे डाग आणि

पाय सुजल्याचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

यापूर्वीही व्हाईट हाऊसने अशा सर्व अफवा फेटाळून लावताना ट्रम्प हे “ठीक आहेत” असे सांगितले होते.

उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यामुळे वादाला उधाण

२७ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी

व्हान्स यांनी USA Today ला दिलेल्या मुलाखतीत,

“देशाला कुठल्याही कठीण परिस्थितीत नेतृत्व करण्यास मी तयार आहे”

असे वक्तव्य केले. मात्र त्याच वेळी त्यांनी, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पूर्णपणे ठीक आहेत” असेही स्पष्ट केले.

तरीसुद्धा या वक्तव्यामुळे ट्रम्प यांच्या प्रकृतीवरून संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले.

कुठला आजार?

फेब्रुवारीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि

जुलैमध्ये युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी भेटीदरम्यान,

ट्रम्प यांच्या हातावर खुणा दिसल्या होत्या. त्यानंतर व्हाईट हाऊसने सांगितले होते की,

ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इनसफीशियन्सी AB9 नावाचा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार झाला आहे.

या आजारामुळे प्रामुख्याने पाय सुजतात. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये हा विकार दिसून येतो.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले होते की,

“हा आजार गंभीर नाही. हृदय किंवा किडनीमध्ये कोणताही गंभीर विकार नाही.”

क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रकृती चर्चेत

१३ जुलै रोजी न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियममध्ये झालेल्या

फिफा क्लब वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ट्रम्प यांच्या पायात सूज स्पष्टपणे दिसली.

त्यानंतर १६ जुलै रोजी बहरीनचे पंतप्रधान सलमान बिन हमदअल खलिफा

यांच्यासोबतच्या भेटीत त्यांच्या हातावरील जखमा छायाचित्रकारांनी टिपल्या.

पुन्हा डाग, पुन्हा चर्चा

२५ ऑगस्ट रोजी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्याशी झालेल्या भेटीत

ट्रम्प यांच्या उजव्या हातावरील जखमांचे फोटो पुन्हा व्हायरल झाले.

हे डाग मेकअपने झाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही सोशल मीडियावर होत आहे.

थोडक्यात, व्हाईट हाऊस ट्रम्प यांच्या प्रकृतीविषयी “सर्व काही ठीक आहे”

असे म्हणत असले तरी सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा,

उपराष्ट्रपतींचे वक्तव्य आणि वारंवार समोर येणारे

हातावरील डाग व पायातील सूज यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/pride-in-o-swadeshi-ahe-pantapradhan-chant-mann-ki-baat-message/